योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेशच्या सीमारेषेआतच पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीपेक्षा मोठा विजय हा एकच पर्याय त्यांच्यापुढे आहे!
आता मोकाट सुटण्याची मुभा काढून घेतल्यामुळे नाकात वेसण घातलेल्या अवस्थेत, शहांच्या करड्या देखरेखीखाली योगींना आगामी विधानसभा निवडणुकीत आजवरची सगळ्यात मोठी कामगिरी करून दाखवणे अपरिहार्य ठरणार आहे. आता आहे, त्यापेक्षा पाच-पंधरा जागा जरी कमी झाल्या तरीही, योगींना ‘कट टु साइज’ केलं जाणार हे उघड आहे. आधीपेक्षा मोठा विजय हा एकच पर्याय त्यांच्यापुढे आहे.......